औरंगाबाद - आजपासून सुरु होणाऱ्या दहावी परीक्षेच्या हॉल तिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी खुद्द संस्था चालकासह लिपीक महिलेने लाच मागितल्याचा भयंकर प्रकार समोर आला. (Maharashtra Ssc Exam 2022) या प्रकरणाची गंभीर दखल घेत अॅन्टी करप्शन ब्युरोने गारखेडा परिसरातील कलावतीदेवी चॅरिटेबल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लिपिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
३० हजार रुपयांची मागणी जवळकर यांनी केली होती
कलावतीदेवी चॅरिटेबल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संपत पाराजी जवळकर (६४,एस. पी जवळकर) यांना दहा हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. तर लिपीक सविता खामगावकर (५१) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. (Today 10TH EXAM 2022) दहावीच्या परीक्षेसाठी हॉल टिकीट आणि पेपरला मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी शिक्षण संस्था चालक जवळकरने केली होती. परंतु, विद्यार्थी व पालकांना जवळकरची मागणी मान्य नव्हती.