औरंगाबाद -दोन वर्षात राज्यात 126 नव्या कंपन्या ( 126 New Companies in The State ) आल्या आहेत. त्यामाध्यमातून 1 लाख 83 हजार कोटीची गुंतवणूक ( 1 Lakh 83 Thousand Crore Investment ) करण्यात आली आहे. 3 लाख 30 तरुणांना रोजगार मिळाला ( 3 Lakh 30 Youths Got Employment ) आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग आले, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai Minister for Industries ) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
'विमानतळ नामांतर लवकरच'
औरंगाबाद शहराचे नाव जनतेच्या मनात आधीच बदललेले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी घोषणा केली, तेव्हापासून जनतेच्या मनात आहे. प्रशासकीय बाबी नंतर होतीलच. त्याचबरोबर विमानतळाचे नामकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असून त्यात विमानतळ धावपट्टी विस्तारबाबत चर्चा करणार असल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.