औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आयकर विभागाची सुरू असलेली तपासणी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू Income Tax Department Raids crackdown आहे. औरंगाबाद मधील व्यावसायिक सतीश व्यास यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे चार वाजता कारवाई सुरू केली Income Tax Department Raids In Aurangabad होती. 24 तासानंतर ही ती कारवाई सुरू असे आहे.
कारवाई आणखी एक दिवस चालण्याची शक्यताराजस्थान येथील मिड डे मिल्सच्या संदर्भात असलेल्या राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यावर देशात विविध ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. औरंगाबाद येथील उद्योजक सतीश व्यास व त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर सकाळी चार वाजता कारवाई सुरू करण्यात IT Raid in Aurangabad आली. वेगळ्या वाहनांमधून आयकर विभागाचे 56 अधिकारी शहरात दाखल झाले होते. त्यानंतर बुधवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर गुरुवारी देखील ही चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. ही कारवाई आणखी एक दिवस चालेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.