औरंगाबाद -गोर बंजारा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले होते. या सभेला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि बंजारा समाजाचे अनेक नेते उपस्थीत होते. सभेला संबोधीत करताना इम्तीयाज जलील यांनी सरकारवर चौफेर टिका केली.
दिल्ली तो झांकी थी विधानसभा अभी बाकी है - इम्तियाज जलील औरंगाबादेत गोर बंजारा समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बंजारा समाजाने वंचितला साथ देण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
अनेक लोक वंचित सोबत जोडले जात आहेत. लोकसभेत कोणाचा पैसा चालला नाही तर फक्त बाळासाहेबांचा आदेश चालला. विधानसभेत आता सर्व रंगाचे झेंडे गेले पाहिजे.आतापर्यंत बंजारा समाज फक्त मतदान करत आला. आता संकल्प करा आता, उगाचच कोणालाही मत देणार नाही. जो न्याय देणार त्याच व्यक्तीलाच मत देणार, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.
विधानसभेला राज्यात धमाका करू
2019 च्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर लोकसभेत येतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. बाळासाहेब आता मात्र राज्यात धमाका करा. लोकसभेत आपण सर्वजण अडकलेले होतो. आता मात्र आपण सर्व मोकळे आहोत. असे विधान जलील यांनी सभेत बोलताना केले आहे.