औरंगाबाद -देशाचा अर्थसंकल्प म्हणजे "मुंगेरीलाल सितारामन"के हसीन सपने असा आहे, अशी टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक असा आहे. खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होणार असून आगामी काळात कोणाचीही नोकरी टिकेल याची शाश्वती नसल्याची जलील यांनी सांगितले आहे.
अर्थसंकल्प म्हणजे 'मुंजेरीलाल सीतारमण' के हसीन सपने, इम्तियाज जलील यांची टीका अर्थसंकल्पात विकासगंगा दिसली नाही -
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मोठी - मोठी स्वप्न दाखविण्यात आली होती. यापुढे काही समस्या नसेल, विकास गंगा वाहत आहे असे चित्र उभे करण्यात आले. पण ते कसं होणार हे माहीत नव्हतं. फक्त मोठे - मोठे आकडे दाखवण्यात आले. दुसरं काय तर देश विकायला काढलाय. सरकारी कंपन्याचे खाजगीकरण करण्याकडे पुढाकार घेतला आहे. यामुळे कोणाचीही नोकरी टिकेल याची मात्र शास्वती यापुढें असणार नाही. त्यामुळे बेरोजगारी निश्चित वाढेल असे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केल.
अर्थसंकल्प हिंदीतून मांडायला हवा -
देशाची राष्ट्रभाषा हिंदी असल्याचे वारंवार सांगितले जाते मग अर्थसंकल्प इंग्रजीतून का? सादर केला जातो, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. सभागृहात असलेल्या बहुतांश खासदारांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमके काय सादर केलंय त्यांना कळत नाही. विशेषतः भाजपच्या खासदारांना सूचना दिलेल्या असतात की अर्थसंकल्प कळला अथवा नाही कळला, तरी प्रत्येक दोन ते तीन मिनिटांनी टाळ्या किंवा टेबल वाजवायचा आहे. त्यामुळे ते सांगितलेले काम करत होते. अशी टीका देखील खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
स्वच्छ भारत घोषणेचे वाजले तीन तेरा -
स्वच्छ भारत मिशनची घोषणा अनेक वेळा करण्यात आली. मात्र, त्याचे काय झाले हे गेल्या वर्षभरात आपल्याला दिसून आले. कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतेचे तीन तेरा होते. आरोग्य यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली होती. आरोग्य यंत्रणा चांगली नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे अर्थसंकल्पमध्ये काय मिळाला हा खरा प्रश्न असल्याची टीका त्यात दिलेली यांनी केली.