औरंगाबाद - राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे ( Abdul Sattar comment on Supriya Sule over cm post ) असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे आहेत, असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. महिला मुख्यमंत्रीबाबत ( Rashmi Thackeray cm option abdul Sattar ) बोलताना त्यांनी हा पर्याय सांगितला.
Abdul Sattar on Supriya Sule : मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडे सुप्रिया असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार - रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पर्याय अब्दुल सत्तार
राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे ( Abdul Sattar comment on Supriya Sule over cm post ) असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे आहेत, असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. महिला मुख्यमंत्रीबाबत ( Rashmi Thackeray cm option abdul Sattar ) बोलताना त्यांनी हा पर्याय सांगितला.
25 वर्षांनंतर होऊ शकतात मुख्यमंत्री -महिला मुख्यमंत्रीचा ( Rashmi Thackeray cm option news ) विषय असेल तर शिवसेनेच्या रश्मी ठाकरे सज्ज आहेत. त्या अभ्यासू आणि हुशार आहेत. त्यांना राजकारणाची जाण आहे. कोणता पुजारी काय म्हणाला माहीत नाही, मी मुस्लीम असल्याने मला पूजापाठ माहीत नाही. उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहावेत, अशी आम्ही प्रार्थना केली आहे. राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. त्या मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला आनंद आहे. मात्र पंचवीस वर्षांनी त्या मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मिश्किल वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सध्यातरी सुप्रिया यांना संधी नाही -शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. पाच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री राहील, असे ठरले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, सध्यातरी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केल.