महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक: पत्नीची विहिरीत उडी, पतीची गळफास घेऊन आत्महत्या - Husband and wife commit suicide in Sillod

तालुक्यातील उंडणगाव येथे कौटुंबिक वादातून पतीच्या समोरच पत्नीने विहिरीत उडी घेतली, तर पत्नीला वाचवण्याऐवजी पतीने तेथून पळ काढत राहत्या घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

By

Published : Jul 1, 2021, 3:05 PM IST

Updated : Jul 1, 2021, 3:20 PM IST

सिल्लोड -तालुक्यातील उंडणगाव येथे कौटुंबिक वादातून पतीच्या समोरच पत्नीने विहिरीत उडी घेतली, तर पत्नीला वाचवण्याऐवजी पतीने तेथून पळ काढत राहत्या घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. संतोष खंडू पाडळे (३८) आणि संगीता संतोष पाडळे (३२ ) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल

याबाबत अधिक माहिती अशी की, उंडणगाव येथे कौटुंबिक कारणामुळे दोघांची वादावादी झाल्याने त्यातूनच संगीताबाईने दुपारी एकच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हे समजताच पतीनेही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय नेण्यात आले आहेत. त्यांना चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेविषयी संजय पाडळे यांनी ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. घटनेविषयी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर, बीट जमादार बाबा चव्हाण, संदिप जाधव हे करीत आहेत.

हेही वाचा -"डॉक्टर डे"लाच पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या, काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

Last Updated : Jul 1, 2021, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details