औरंगाबाद -पुंडलिक नगरमध्ये हॉटेल मालकाने आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली. अशोक पांडुरंग जाधव (वय 59) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडल्याने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर येथे राहणाऱ्या अशोक जाधव यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी घराच्या जिन्यात असलेल्या लोखंडी ग्रीलला नायलॉन दोरीने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जाधव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. आत्महत्येच्या काही वेळ आधी त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी ते अस काही करतील असं वाटत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पुंडलिक नगर येथे हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या; लॉकडाऊनमुळे आत्महत्या केल्याचा संशय - aurangabad suicide
औरंगाबादमध्ये हॉटेल मालकाने आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली. अशोक पांडुरंग जाधव (वय 59) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते. त्यांचा पुंडलिकनगर भागात हॉटेल आणि बार होता. लॉकडाऊन मुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांनी हे पाऊल उचलले तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली असता, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना पोटाचा विकार झाला होता. त्यामुळे ते खूप दिवसांपासून अस्वस्थ होते आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. अशी माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार हिंगे करत आहेत.