औरंगाबाद - महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी करण्यात आली. महानगरपालिकेतील वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी आणि शिवसेनेची लोकांना नकोशी असलेली सत्ता नष्ट व्हावी, यासाठी ही होळी करण्यात आल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.
औरंगाबादमध्ये मनसेकडून पालिकेच्या 'भोंगळ कारभाराची होळी' हेही वाचा....पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामावर अमितची नजर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आकाशवाणी भागातील संपर्क कार्यालयासमोर होळी तयार करण्यात आली होती. या होळीला महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या समस्यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. शहरातील पाणी समस्या, कचरा, रस्ते या सर्व समस्यांची होळी व्हावी आणि महानगर पालिका निवडणुकीत मनसेची सत्ता यावी, अशी मनोकामना यावेळी करण्यात आली.
हेही वाचा...'इडापिडा टळो, कोरोना व्हायरस होळीत जळो'
औरंगाबाद महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची होळी करण्यात आली. होळी निमित्त वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते. औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या समस्या असो की कचऱ्याच्या समस्या, या न संपणाऱ्या समस्या आहेत. महानगरपालिकेचा कारभार करणाऱ्या वाईट प्रवृत्तीमुळे या समस्या सुटत नाहीत, पालिकेत सत्ताधारी पैसे खाऊन विकास करत नाहीत, असा आरोप मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला.
अशा वृत्तींचा नाश करणे गरजेचे असल्याने मनसेने होळीला पालिकेच्या भोंगळ कारभारांचे फलक लावले. त्यासोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेचा पायउतार व्हावा आणि शहराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी मिळावी, यासाठी पालिकेची होळी जाळल्याचे सुमित खांबेकर यांनी सांगितले.