औरंगाबाद - केंद्र सरकारने शेतकरी कायदा लागू केला असला तरी महाराष्ट्र सरकारने राज्यात कायदा लागू होणार नाही, असे आदेश काढले आहेत. या आदेशाची होळी करत भाजपने आपला निषेध व्यक्त केला. राज्य सरकार शेतकऱ्यांनाचे नुकसान करत असून भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी मांडली.
शेतकरी कायद्याच्या विरोधात राज्याने काढलेल्या आदेशाची भाजपकडून होळी - औरंगाबाद भाजप हरिभाऊ बागडे बातमी
राज्य सरकारचा निषेध म्हणून शेतकरी कायदा लागू न करण्यासाठी काढलेल्या आदेशाची होळी करण्यात आल्याचे माजी विधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कोणाला विकायचा याचा अधिकार दिला. मात्र, तो राज्य सरकारने हिरावल्याने भाजप सरकारचा तीव्र निषेध करत असून राज्य सरकार विरोधात आम्ही रान उठवू, असा इशारा हरिभाऊ बागडे यांनी दिला.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, किसान मोर्चाचे कल्याण गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत सरकारी आदेशाची होळी केली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदा लागू केला. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेती माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कंपन्यांना थेट शेतकऱ्यांशी करार करता येणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, राज्य सरकारने फक्त केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्याने त्याला विरोध म्हणून कायदा लागू न करण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना दिलेल्या अधिकारांना हिरावण्याचे काम केले जात असल्याने राज्य सरकारचा निषेध म्हणून शेतकरी कायदा लागू न करण्यासाठी काढलेल्या आदेशाची होळी करण्यात आल्याचे माजी विधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कोणाला विकायचा याचा अधिकार दिला. मात्र, तो राज्य सरकारने हिरावल्याने भाजप सरकारचा तीव्र निषेध करत असून राज्य सरकार विरोधात आम्ही रान उठवू, असा इशारा हरिभाऊ बागडे यांनी दिला.