महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिजाब गर्ल मुस्कानचा सत्कार औरंगाबादलाच होईल - प्रकाश आंबेडकर - हिजाब गर्ल मुस्कान सत्कार औरंगाबाद

हिजाब गर्ल मुस्कानचा ( Hijab Girl Muskan felicitation ) सत्कार कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. न्यायालयाने परवानगी न दिल्याने आता 22 मार्च नंतर हा सत्कार औरंगाबादेतच होईल आणि मोठ्या प्रमाणात होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी दिला.

Hijab Girl Muskan felicitation aurangabad
हिजाब गर्ल मुस्कान सत्कार प्रकाश आंबेडकर प्रतिक्रिया

By

Published : Mar 14, 2022, 10:49 PM IST

औरंगाबाद - हिजाब गर्ल मुस्कानचा ( Hijab Girl Muskan felicitation ) सत्कार कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. न्यायालयाने परवानगी न दिल्याने आता 22 मार्च नंतर हा सत्कार औरंगाबादेतच होईल आणि मोठ्या प्रमाणात होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी दिला.

माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

हेही वाचा -National Women Chess Championship: राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीला उपविजेतेपद

आंबेडकर यांची सरकारवर टिका..

राज्य सरकार धर्मनिरपेक्ष सरकार नाही. आम्हाला आधी परवानगी दिली आणि नंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला. आज खांडपीठात अर्ज केला आहे. मुस्लीम महिलांचा पेहराव कायद्याचा विषय होऊ शकत नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मुस्कानचा सत्कार औरंगाबादमध्येच होईल..

दुर्दैवाने न्यायाल्याने पोलिसांना 22 तारखेपर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले, मात्र त्या आधी कर्नाटक हायकोर्ट मुस्कान केसमध्ये उद्या निकाल देईल, अशी अपेक्षा आहे. न्यायालय मुस्कानच्या बाजूने असेल असा विश्वास आहे. आम्ही न्यायालयाला मान देतो आणि 22 तारखेनंतर मुस्कानच्या सत्काराची तारीख घेऊ. मोठा कार्यक्रम घेऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

हेही वाचा -Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम? लेफ्टनंट कर्नल ढगेंशी खास बातचीत

ABOUT THE AUTHOR

...view details