औरंगाबाद -गेल्या पाच वर्षात सरकारने केलेल्या कामांमुळे युती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण देताना. आधीच्या सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. मात्र आम्ही त्यातल्या त्रुटी दूर करून आरक्षण दिल मात्र निवडणुकीच्या तोंडावर काही लोक राजकारण करू पाहत असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
2019 च्या निवडणुकांआधी अनेक आमदारांनी राजीनामे दिले. सर्वाधिक राजीनामे मी स्वीकारले, कोणाला लोकसभा लढवायची होती, कोणाला पक्ष बदलायचे होते त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले. माझं काम स्वीकारायचं होत ते मी केलं असल्याचं हरीभाऊ बागडे यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे सिंचन घोटाळ्याबाबत 2014 च्या निवडणुकीत आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं. त्याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर निश्चितच कारवाई होईल, असं बागडे यांनी सांगितलं. आधी राज्यात दुष्काळ पडला की रोजगार हमी योजनेची काम मागायला लोकं जास्त होती. मात्र, आता ही सर्व काम केंद्र सरकार मार्फत केली जातात. त्यात अनेक कामांमध्ये कुशल काम अधिक असल्याने यंत्रांचा वापर अधिक केला जातो. यामुळे कामं थोडी कमी झाल्याचे हरीभाऊ बागडे यांनी सांगितले. याआधीच्या निवडणुका या वेगळ्या होत्या आता बराच फरक पडला आहे. आधी आम्ही आमच्या मतदारसंघात घरोघरी जाऊन आपले म्हणणे मांडायचो. निवडणूक प्रचाराला काळ पण अधिक मिळत होता.
आता साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रचार पद्धती बदलल्या आहेत. मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, या सर्वांमुळे प्रचार वेगळ्या प्रकारे केला जातो, असा अनुभव हरिभाऊ बागडे यांनी सांगितला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लोकांची खूप काम केलेली आहेत. त्यामुळे केंद्रासारखाच विश्वास जनता राज्य सरकारवर दाखवेल आणि पुन्हा एकदा राज्यात युती सरकार येईल, असे विश्वास बागडे यांनी यावेळी व्यक्त केला.. यासारख्या अनेक गोष्टीवर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.