औरंगाबाद- महानगरपालिकेने शहरातील समस्यांकडे लक्ष न दिल्याने त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत भोगावे लागले. अन्यथा रावसाहेब दानवे यांच्यासोबत चंद्रकांत खैरे हे देखील खासदार असते, असे म्हणत खैरे यांच्या पराभवाचे कारण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ते औरंगाबादच्या म्हाडा येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती.
....तर चंद्रकांत खैरे हे देखील खासदार असते - हरिभाऊ बागडे - chandrakant khaire
औरंगाबादच्या म्हाडा येथील कार्यक्रमात खैरे यांच्या पराभवाचे कारण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
महानगरपालिकेचा डीपी प्लॅन अद्याप तयार नाही. त्यामुळे 20 बाय 30 चे घर अद्यापही अनधिकृत आहे. मात्र, 20 बाय 30चे प्लॉट आता अधिकृत होणार आहेत. महापालिकेच्या कारभारामुळे परिणाम भोगावे लागले. लोकांना सुविधा द्या, असे आवाहन हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केले. म्हाडाच्या कार्यक्रमात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
आजकाल कार्यकर्त्यांना सांभाळणं महत्वाचे झाले आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने केलेल्या कामांमुळे दुसऱ्यांदा सरकार आले आहे. म्हाडासाठी कुठे जागा लागली तर सांगा, आमदार खासदार मदत करतील. वेळ आली तर मुख्यमंत्र्यांना भेटून जागा मागेल. मात्र, गरिबांना घर मिळाले पाहिजे, असे हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले.