औरंगाबाद -ईडी कारवाई ( Enforcement Directorate Action ) झाल्यामुळे ताठ मानेने फिरणार्या लोकांचं पितळ उघडं पडलं. त्यामुळे आता जळफळाट होत आहे. अशी टीका माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद ( Haribhau Baghade On Raut ED Action ) येथे भाजप वर्धापन दिना ( BJP Foundation Day ) निमित्त निघालेल्या रॅलीमध्ये ( BJP Anniversary Rally in Aurangabad ) केली. दरम्यान ते म्हणाले की, राज्यात महाराष्ट्रात पुन्हा भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुरावे सादर करावे - ईडी कारवाई करताना सबळ पुरावे असल्याशिवाय करत नाही. तुमच्याकडे आलेली संपत्ती कुठून आली याबद्दल तुम्ही माहिती सांगितली पाहिजे, तुमच्याकडे येणारे उत्पन्न कस आलं, कुठून आलं. याबाबत तुम्ही तपशील द्यायला हवा. मात्र तो तपशील तुम्ही देत नाहीत. त्यामुळे मग ईडीला कारवाई करावी लागते. आणि ही कारवाई नेहमीच केली जाते. जर तुमच्याकडे मिळवलेली संपत्तीबाबत पुरावे असतील तर ते सादर करा, असा सल्ला हरिभाऊ बागडे यांनी राज्यातील महा विकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या नेत्यांना दिला.