महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिल्लोडमध्ये आढळला झाडावर लटकलेला मानवी सांगाडा

सिल्लोड तालूक्यातील केळगाव परिसरातील मुर्डेश्वर शिवारामध्ये एका सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकेला आढळ्याने खळबळ उडाली आहे.

मानवी सांगाडा
मानवी सांगाडा

By

Published : May 19, 2021, 4:31 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील मुर्डेश्वर शिवारामध्ये एका सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकेला आढळ्याने खळबळ उडाली आहे.

'झाडाला गळफास घेऊन आत्महत्या'

सकाळी दहा वाजेदरम्यान परिसरातील वनमजूर जंगलात गस्त घालत असताना त्याला सागाच्या झाडाला मानवी देहाचा सांगाडा लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वनमजूराने ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रल्हाद मुंढे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली आसता सागाच्या झाडाजवळ मृताच्या शर्टच्या खिशात मोबाईल आधारकार्ड व डायरी सापडली आहे. आधारकार्वरून मृत व्यक्ती ही सिल्लोड तालुक्यामधील मोढा बु. येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सिल्लोडमध्ये आढळला झाडावर लटकलेला मानवी सांगाडा

महिनाभरापासून होता बेपत्ता
सदरील मृत व्यक्तीचे नाव शंकर पांडु महाकाळ (वय ७५, रा. मोढा, ता. सिल्लोड) हे १५ एप्रिल रोजी मोढा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली होती.

परिसरात चर्चेला उधाण
तब्बल एक महिन्यानंतर बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सांगाड्यात सापडल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी पाहणी करून मृताचे शवविच्छेदनही करण्यात आले असून नेमका हा प्रकार काय आहे हे तपासानंतर कळेल या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा -वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जूनपासून; अमित देशमुखांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details