महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उस्मानपुरा पोलिसांनी आठ लाखांचा गुटखा केला जप्त, दोन जण अटकेत

राज्यात बंदी असलेला गुटखा बाजारात आणणारा टेम्पो औरंगाबाद पोलिसांनी पकडला. या टेम्पोत आठ लाखांचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

gutkha seized
उस्मानपुरा पोलिसांनी आठ लाखांचा गुटखा केला जप्त

By

Published : Oct 22, 2020, 7:47 PM IST

औरंगाबाद -राज्यात बंदी असलेला गुटखा बाजारात आणणारा टेम्पो औरंगाबाद पोलिसांनी पकडला. या टेम्पोत आठ लाखांचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, गुटखा कुठून आला आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता यांचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय; माजी मंत्री पंकजा मुंडे

गुटख्याने भरलेला टेम्पो शहरात येत असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारुन टेम्पो पकडला. या छाप्यात होलसेलने गुटख्याची विक्री करणा-या शिवहर गोपाळराव मालशिखरे (४०, रा. गणेशनगर, पुंडलिकनगर) आणि टेम्पो चालक शाम पांडुरंग वाघमारे (२०, रा. शिवाजीनगर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ लाखांचा गुटखा आणि टेम्पो असा पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उस्मानपुरा, मिलींदनगर भागातून गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच-२०-ईएल-५०५२) जाणार असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, शिपाई अश्रफ सय्यद, सतीश जाधव, संतोष शिरसाठ आणि प्रकाश सोनवणे यांनी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या टेम्पोतून पोलिसांनी हिरा गुटख्याचे ४२ पोते जप्त केले. विशेष म्हणजे, जनावरांसाठी लागणाऱया ढेपेच्या पोत्याआड गुटख्याचे पोते लपवून नेले जात होते. मालशिखरे हा गुटख्याचा होलसेल व्यापारी आहे. त्याने परराज्यातून गुटखा आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details