महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जीवन गुणवत्तेत शहर पहिल्या दहामध्ये आणू - पालकमंत्री सुभाष देसाई - Guardian Minister Subhash Desai News

पाणी प्रश्नावर बोलताना देसाई म्हणाले की, 'शहराला सध्या सहा ते सात दिवसाआड पाणी मिळत आहे. यावर लवकरच तोडगा काढणार आहे. यासाठी लवकरच पाण्याचे नियोजन करून उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. तसेच, बेरोजगारीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमातून शहरातला सर्वाधिक निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करू,' असे पालकांना सुभाष देसाई म्हणाले.

Guardian Minister Subhash Desai News
पालकमंत्री सुभाष देसाई न्यूज

By

Published : Mar 6, 2021, 7:26 PM IST

औरंगाबाद - जीवन गुणवत्तेत औरंगाबाद शहर १३ व्या स्थानी आहे. यापुढेदेखील शहरातील नागरिकांचे जीवन कसे आनंदी होईल, यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून शहर पहिल्या दहा शहरांत येईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधून व्यक्त केला.

जीवन गुणवत्तेत शहर पहिल्या दहामध्ये आणू - पालकमंत्री सुभाष देसाई
महापालिका आयुक्तांचे कौतुक

'शिक्षण, आरोग्य यासह इतर आघाड्यांवर आपले शहर सरस ठरले आहे. यामुळे केंद्र सरकारने शहराला हे गुण दिले आहे. यासाठी महापालिका आयुक्त, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शहराबद्दल ममत्व असल्याने त्यांना सर्वात मोठी पाणी योजना दिली. तसेच शहरासाठी मोठी समस्या ठरलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन दिले. यामुळे औरंगाबाद शहर कचरा प्रश्नातून बाहेर आले आहे. यामुळे आपल शहर लवकरच सुपर संभाजीनगर होईल,' असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

पाणी प्रश्नावर बोलताना देसाई म्हणाले की, 'शहराला सध्या सहा ते सात दिवसाआड पाणी मिळत आहे. यावर लवकरच तोडगा काढणार आहे. यासाठी लवकरच पाण्याचे नियोजन करून उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. तसेच, बेरोजगारीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमातून शहरातला सर्वाधिक निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करू,' असे पालकांना सुभाष देसाई म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details