औरंगाबाद - राज्यात सतत पाऊस पडत असल्याने दिवसेंदिवस नुकसान वाढत चालले आहे, त्यामुळे पंचनामे झाल्यावर नेमके किती नुकसान झाले ते समजेल. त्यानंतरच मदतीबाबत सांगता येईल. मात्र, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीची मदत देण्याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
हेही वाचा -गंगापूर तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; अनेक गावांचा संपर्क तुटला
जमीन आणि घरांचे नुकसान झाले आहेत. एका ठिकाणी विहिरीचे नुकसान, तर काही ठिकाणी जनावरे वाहून गेलेली आहेत. ही सर्व परिस्थिती बघितली तर, आपल्याला जोपर्यंत पंचनामे होणार नाही, तोपर्यंत कोणत्या व्यक्तीचे किती नुकसान झाले हे कळणार नाही, तोपर्यंत मदत शक्य होणार नाही. पंचनामे झाल्यानंतर सरकार तातडीने मदत करणार आहे. जीवितहानी झाली त्यांना चार लाख रुपयांची मदत सरकार करत आहे, जणावरांचे नुकसान झाले असेल तर शासनाच्या नियम, निकषानुसार मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे, अशी माहिती सत्तार यांनी दिली.
राज्य सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली. कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या, परंतु जोपर्यंत आकडा येणार नाही, तोपर्यंत किती मदत द्यायची, हे कळणार नाही. मदतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करतील, अशी भूमिका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -गुलाब चक्रीवादळ : कुठे घरात शिरले पाणी तर कुठे वीजपुरवठा खंडित