औरंगाबाद - राज्यात कुटुंब नियोजन बाबत जनजागृती करण्यासाठी जाणाऱ्या आशा वर्करकडे देण्यात आलेल्या कुटुंब नियोजनाच्या किटवरून नव्या वादाला तोंड फुटले ( Family Planning Kit For Aasha Workers ) आहे. या साहित्यात महिला आणि पुरुषाचे रबरी लिंग देण्यात आले असून, त्या माध्यमातून पुरुषांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. यामुळे आशा वर्कर यांची अवेहलना होण्याची शक्यता असल्याने सिटू आशा वर्कर संघटनेने निषेध व्यक्त केला ( Family Planning Kit Controversy Aurangabad )आहे.
'ते' रबरी लिंग घेऊन जनजागृतीचा प्रकार अत्यंत लज्जास्पद.. आशा स्वयंसेविकांचा विरोध अशी आहे किट..
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कुटुंब नियोजन समुपदेशन करून लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेले कीट सध्या वादात आहे. ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजनन अवयवांचे रबरी अवयव समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय गर्भधारणेची संबंधित इतर सामग्री देखील या किटमध्ये वापरण्यात आली आहे. या मॉडेलचा समावेश किटमध्ये केल्यामुळे आशा स्वयंसेविकाना पुरुषांना माहिती देताना लाजिरवाने वाटत आहे, अशी तक्रार अनेक आशा स्वयंसेविका केले आहे. त्यामुळे जनजागृतीसाठी नवी पद्धत नको अशी मागणी आशा स्वयंसेविका संघटनांनी केली आहे.
लाजिरवाणा प्रकार..
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करणे हा उद्देश चांगला असला तरी संबंधित किटमुळे आशा स्वयंसेविका यांचा मानहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजातील काही अपप्रवृत्तीची टवाळखोर मंडळी मुद्दाम आशा सेविकांना थांबून आम्हाला या कीडबाबत माहिती द्या त्यामध्ये कशा पद्धतीने जनजागृती करत आहेत याची माहिती द्या, असं वारंवार सांगून त्यांची अवहेलना करू शकतो. त्यामुळे हा लाजीरवाणा प्रकार असून, औरंगाबाद जिल्ह्यात अजून अशा किट आल्या नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इतर ठिकाणी आशा सेविकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता याचा निषेध करत असल्याचं सिटू आशा स्वयंसेविका संघटना सचिव मंगल ठोंबरे यांनी सांगितलं.