औरंगाबाद - शहराच्या नामांतराचा वाद पेटलेला असताना गुगलवर शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर ( Aurangabad Renamed Issues ) असा करण्यात आला आहे. सर्चमध्ये औरंगाबाद असे टाकल्यास संभाजीनगर असादेखील उल्लेख आढळून ( Aurangabad Renamed Sambhaji naga ) येत आहे. या आधी टाटा समूहाच्या क्रोमा या बँड मधे शहराचे नाव बदलण्यात आले होते. त्यामुळे केंद्रांचे नाव बदलला हिरवा कंदील देण्याआधीच असे बदल होत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीने नावाचा प्रस्ताव केला होता मंजूर-माहविकास आघाडीतर्फे सरकार कोसळणार लक्षात ( Aurangabad Renamed Sambhajinagar ) येताच औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नाव बदलला मंजुरी दिली. त्यानंतर देशातील राजकारण तापले होते. त्यात शिंदे सरकारने नाव बदलाचा प्रस्ताव स्थगित करून नवीन प्रसातावला मान्यता दिली. त्यावरून राज्यातील चर्चांना उधाण आले ( Aurangabad Latest news ) आहे. काही झालं तरी केंद्राकडून नावाला लवकर मंजुरी मिळवून नामांतराच्या प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढू अस शिंदे गट आणि भाजप तर्फे सांगण्यात येत आहे. मात्र त्या आधी अनेक ऑनलाईन सांकेतिक स्थळांवर शहराचे नाव संभाजीनगर अस आढळून येत असल्याने नामांतर विरोधी संघटनांनी टीका करत इतकी घाई का? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.
गुगलने केला बदल-गुगल सांकेतिक स्थळावर काहीही माहिती हवी असल्यास अचूक माहिती आपल्याला मिळते. त्यात शहरांची नाव असो की एखादा पत्ता त्याची माहिती दिली जाते. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच प्रणालीत बदल करण्यात आल्याने आता औरंगाबाद असे टाकल्यावर संभाजीनगर असादेखील उल्लेख दिसून येत आहे. त्यामुळे नवा वाद सुरू होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस नेत्यांचा नामांतराला विरोध-ठाकरे सरकारने पाय उतार होत असताना औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारीत ( Aurangabad Renamed Sambhaji nagar ) केला. यात आधीपासून नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे ( Aurangabad congress workers ) माजी पदाधिकारी आक्रमक झाले असून शहराच्या बदलाच्या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याच्या तयारीत ( congress workers doing Rebellion ) आहेत. यापुढे माझ्या शहराचे नाव बदलण्यास माझा विरोध राहील. आम्ही आमच्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांना काय सांगायचे. त्यामुळे मी जिल्ह्यातील समाजिक चळवळ चालवणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन नामांतर विरोधी चळवळ चालणार असून त्यात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन, स्वाक्षरी मोहीम यांच्यासह रस्त्यावरील आंदोलनाचा समावेश उस्मानी हिशाम उस्मानी यांनी सांगितले.
हेही वाचा-Aurangzeb Tomb Controversy : 'औरंगाबाद शहराचे नाव बदलाल!, मात्र पुऱ्यांचे, वास्तूंची नावे कसे बदलणार?'