औरंगाबादभारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत Indian Independence Day आहेत. या काळात देशाच्या आरोग्य व्यवस्थेने जागतिक पातळीवर वेगळी छाप पाडली आहे. त्यामधे औरंगाबादचे Aurangabad घाटी म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय Ghati Hospital गरिबांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. गेल्या ६२ वर्षात या महाविद्यालयाने गोर गरीब रुग्णांना रुग्णालयाची सेवा देत जीवनदान देण्याचे कार्ये significant role in providing healthcare केले.
१९६२ मधे घाटीची स्थापनामराठवाडा आणि आसपासच्या परिसरात मेरिट मधे असणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी घाटी म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापण करण्यात आले. मागास समजल्या जाणाऱ्या या भागात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले. चांगली आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा या भागात नसल्याने रुग्णांना मुंबई पुणेची वाट धरावी लागत होती. आणि ते गरिबांना परवडणारे नव्हते. घाटीच्या स्थापनेनंतर औरंगाबाद सारख्या आणि आसपास असणाऱ्या दहा ते बारा जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला. मोठा अपघात असो की जोखमीची शस्त्रक्रिया गरीब असो की श्रीमंत घाटी आपले कर्तव्य बजावते. आजही खात्रीशीर रुग्णसेवा म्हणले तर एकच नाव येते ते म्हणजे घाटी रुग्णालय.
कोरोना काळात दिली सेवा२०२० हे वर्ष जगावर मोठे संकट घेऊन आले. कोरोना सारख्या महामारीमुळे हाहाकार माजला चांगले चांगले रुग्णालय रुग्णसेवा देण्यास असक्षम होते. त्यावेळी घाटी रुग्णालयाने मोठ्या जिकरिने रुग्णसेवा दिली. जागा मिळेल तिथे रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. तशी यंत्रणा सज्ज करण्यात आली. खाजगी रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना घाटी रुग्णालयात पाठविण्यात येत होते. त्यावेळी रुग्णांना परत न पाठवता चांगले उपचार मिळावे त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. डॉक्टर परिचारिका सेवा देतांना बाधित झाले. तरीही न घाबरता उपचार सुरूच राहिले. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांना या काळात सेवा दिली ती म्हणजे घाटी रुग्णालयाने.
४५० बाधित महिलांची झाली प्रसूतीकोरोना काळात महिलांना प्रसूतीसाठी अनेक अडचणी आल्या. सर्वत्र आजराचे सावट असल्याने खाजगी रुग्णालयात असलेले निर्बंध आणि भीती यामुळे प्रसूतीसाठी दाखल करून घेता येत नसे. त्यात बाधित गर्भवती महिलांना कोणीही दाखल करून घेण्यास व रिस्क घेण्यास तयार नव्हते. त्या काळात घाटी रुग्णालयात प्रसूती विभागात ४५० महिलांची यशस्वी प्रसूती करण्यात आल्या. यात बाधित असल्याने १५ महिलांचे दुर्दैवी मृत्यू झाले. मात्र अशा परिस्थितीतही धोका पत्करून डॉक्टर आणि परिचारिकांनी सेवा दिली. बाधित महिलांच्या मुलांचा सांभाळ केला. त्यामुळे घाटी रुग्णालयातील विश्वासाहर्ता वाढली आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १८ हजार प्रसूती घाटीत होतात. स्वतंत्र भारतात उत्तम आरोग्य सुविधा देण्यात घाटी रुग्णालयाचा मोलाचा वाटा आहे हे नक्की.
हेही वाचाShinde government सरकार नाही थाऱ्यावर आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर