महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fuel Vegetable Price Hike : इंधन दरवाढ.. त्यात धान्य, भाजीपाला महागला.. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले - महागाई वाढली

सातत्याने वाढत चाललेल्या महागाईमुळे ( Inflation Increased ) सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. इंधनाच्या होणाऱ्या दरवाढीमुळे धान्य आणि भाजीपाल्याचे दरही कडाडले ( Fuel Vegetable Price Hike ) आहेत. त्यामुळे या महागाईत दिलासा कधी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे.

इंधन दरवाढ.. त्यात धान्य, भाजीपाला महागला.. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले
इंधन दरवाढ.. त्यात धान्य, भाजीपाला महागला.. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले

By

Published : Apr 13, 2022, 4:57 PM IST

औरंगाबाद - इंधनाच्या वाढणाऱ्या दरांमुळे महागाई वाढत चालली ( Inflation Increased ) आहे. त्यात मोठा फरक पडला आहे तो भाजीपाल्याच्या ( Fuel Vegetable Price Hike ) दरात. परिणामी गोरगरीबांसह माध्यमवर्गीय कुटुंबियांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यात दिलासा मिळणार कसा असा प्रश्न पडला आहे.


इंधनाचे दर वाढ ठरते डोकेदुखी :इंधन दरवाढ सध्या सर्वसामान्यांची डोकेदुखी ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये जवळपास 12 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. औरंगाबाद शहरात पेट्रोल 122.60 रुपये तर डिझेल 103.80 रुपये इतके झाले आहे. त्यामुळे याचा परिणाम प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूकीवर झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. उत्पन्न मर्यादित आणि खर्च वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.


भाजीपाला महागला :मागील एक आठवड्यापासून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यामध्ये पालेभाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. पालेभाज्या दहा रुपयात दोन किंवा तीन जुडी मिळत होत्या. मात्र त्याच आता दहा ते 15 रुपयात एक मिळत आहेत. तर लिंबांचे दर 150 किलो रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मागील दोन दिवसात ते दर 25 रुपयांनी कमी झाले असले तरी, पहिल्या दरांपेक्षा 90 रुपये अधिक आहेत. इतर भाज्यांचे दरदेखील काही प्रमाणात वाढले आहेत. गोबी, भेंडी, वांगे, टमाटे आणि इतर भाज्यांचे दर 40 ते 50 रुपये किलो इतके असून, तेलाचे दरदेखील वाढले आहेत. तर धन्यांचे दर देखील प्रतिकिलो 3 ते 7 रुपये वाढले असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील अन्न महाग झाले असच काहीस चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प..

ABOUT THE AUTHOR

...view details