औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून काही तासांमध्ये चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांमध्ये रुग्ण दगावण्याची मंदावलेली गती पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1250 वर पोहोचली आहे.
काही तासांमध्ये झाला चौघांचा मृत्यू....
औरंगाबाद शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील 38 वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील पाचोड येथील 75 वर्षीय बाधित महिला रुग्णावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. शहरातील चिकलठाणा परिसरातील 65 वर्षे बाधित पुरुष रुग्णावर सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील करमाद तालुक्यातील वरुड काजी परिसरात राहणाऱ्या 52 वर्षे बाधित पुरुषावर चार फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या 976 वर पोहोचली आहे.