औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी 29 रुग्ण वाढले असताना मंगळवारी सकाळी 13 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या थेट 95 वर पोहोचली आहे.
शहरातील किलेअर्क हा भाग नवीन हॉटस्पॉट निर्माण झाला आहे. गेल्या दहा दिवसात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. किलेअर्क येथे 25 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने परिसर सील करून घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली जात आहे.
गेल्या दोन दिवसात औरंगाबादेत कोरोनाची दहशत वाढली आहे. तीनच दिवसात कोरोनाचे पन्नासहून नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नूर कॉलनीत - 12, किलेअर्क - 25, काळा दरवाजा - 1, आसेफिया कॉलनी - 2, भीमनगर - 2, टाऊनहॉल या भागांचा समावेश आहे. आतापर्यंत 23 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत तर 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.