औरंगाबाद -आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे आमरण उपोषण सोडवले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री यांनाही विषय माहीत आहे. आता त्यांच्यावर वेळ आली आहे. अडचणी आणि मुद्दे माहीत आहेत, त्यामुळे त्यांनी आता चर्चा नाही तर कृती करावी, असे मत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Former MP Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. कारण समाज पुढारलेला आहे असे त्यांना वाटते. आता सामाजिक मागासले पण सिद्ध करावे लागेल. हे काम सोपे नाही, मात्र ते करावं लागणार आहे. त्यासाठी मागास आयोग स्थापन करावी लागेल. आताच्या सरकारला मूलभूत प्रश्न माहीत आहेत, मागण्या माहीत आहेत. एकनाथ शिंदे यांनीच आमचे उपोषण सोडवले होते, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
Sambhajiraje Chhatrapati :'...त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने आता मराठा समाजासाठी कृती करावी' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी कृती करावी
मराठा समाजाला आरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. कारण समाज पुढारलेला आहे असे त्यांना वाटते. आता सामाजिक मागासले पण सिद्ध करावे लागेल. हे काम सोपे नाही, मात्र ते करावं लागणार आहे. त्यासाठी मागास आयोग स्थापन करावी लागेल. आताच्या सरकारला मूलभूत प्रश्न माहीत आहेत, मागण्या माहीत आहेत. एकनाथ शिंदे यांनीच आमचे उपोषण सोडवले होते, असे मत संभाजीराजे छत्रपती ( Former MP Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी व्यक्त केले.
![Sambhajiraje Chhatrapati :'...त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने आता मराठा समाजासाठी कृती करावी' Sambhajiraje Chhatrapati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16067026-thumbnail-3x2-a.jpg)
'अपेक्षित घटकांसाठी स्वराज्य काम करेल' :कोण पक्षातून उडी मारत, कोण कोणावर टीका करत यावर आम्हाला बोलायचे नाही. मात्र यापुढे आमची टाकत आम्हाला कोणालाही द्यायची नाही. स्वराज्य संघटना उपेक्षित आणि सत्तेत जाऊ न शकणाऱ्या घटकांसाठी काम करणार आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या संघटनेचा लोगो आम्ही जाहीर केला. स्वराज्य संघटना तळागाळातील माणसाला ताकत देण्यासाठी काम करेल. जसे शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बळ दिले तसे आम्ही पण गरिबांना बळ देणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तर मंत्रिमंडळमध्ये कुणाला घ्यावे हा त्यांचा विषय आहे. चांगले लोक असतांना डागाळलेल्यां लोकांना का घेतले हा प्रश्न येतो. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर कौतुक होण्यापेक्षा टीका अधिक होत आहे. सर्वच प्रतिनिधींनी काही तरी काम केलेलं असते. म्हणूनच ते आमदार म्हणून निवडणूक येतात. अनेक जण चांगले काम देखील करतात. अशा लोकांना पण संधी मिळाली पाहिजे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून लगेच संघटन राजकीय करणे शक्य नाही. मी कुणालाही गुवाहाटीला किंवा काश्मीरला घेऊ जाऊ शकत नाही. पैसे असतील तरच राजकारण शक्य नाही, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -Arvind Sawant : सुशील मोदींच्या वक्तव्यानंतर अरविंद सावंतांचा भाजपावर निशाणा, म्हणाले...