औरंगाबाद -कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा, रेल, नावडी परिसरात लांडगा व तरस यांसारखे वन्य प्राणी आढळून येतात. बनशेंद्रा परिसरात गेल्या काही दिवसापासून एका तरसाने धुमाकूळ घातला होता. या तरसाला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. तरसाने अनेक शेतकरी महिला व पुरुषांना चावा घेवून जखमी केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
बनशेंद्रा परिसरात वनविभागाची कारवाई, तरसाला पकडण्यात वनविभागाला यश हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न
सहाय्यक वंसरक्षक सचिन शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली या वन्यप्राण्यांना पकडन्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. अखेर या पथकाने तालुक्यातील बनशेंद्रा परिसरात तरसाला पकडून जेरबंद केल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यानी सुटकेचा श्वास सोडला आहे.
हेही वाचा... केंद्र सरकारकडून राज्यांना ३५ हजार कोटींचा जीएसटी मोबदला वितरित
बनशेंद्रा भागातील रेल नावडी शिवाराकडून एक लांडगा डोंगर ओलांडून वनक्षेत्राकडून आला. यानंतर शेतात काम करत असलेल्या कुलसमबी इमाम पठाण यांच्यावर त्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर रमेश भिकन वाघ, हकीम नबाब शेख यांच्यावरही हल्ला केला होता. या प्रमाणेच तालुक्यातील रेल नावडी परिसरात तरस या वन्यप्राण्यानेही गेले काही दिवस हौदोस घातला होता. त्याने केलेल्या हल्लात दोन महिला जखमी झाल्या होत्या. कल्पना विलास जाधव (वय ४०) कमलबाई लक्ष्मण जाधव (वय ५०) अशी त्या महिलांची नावे आहेत.
हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..
या तरसाला पकडण्यासाठी वनविभागाने वनरक्षक एम. ए. शेख व वन मजुर अशोक आव्हाड आदी कर्मचाऱ्यांची एक टीम तयार केली. या तरसाला पकडण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी जाळी लावली होती. या पथकाने अथक परिश्रम घेवून बनशेंद्रा शिवारात या तरसाला जेरबंद केले आसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद वजोरिद्दीन यांनी दिली आहे.