महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक; मनपाने साठवून ठेवलेल्या कचऱ्याच्या गोदामाला आग - कचरा

रमा नगरातील शेडमध्ये अशाच पद्धतीने साठविलेल्या सुक्या कचऱ्याला गुरुवारी भीषण आग लागली. यात शेड्ससह कचरा जळून खाक झाला आहे. या आगीत शेजारील दोन मोठी झाडेही भस्मसात झाली आहेत.

कचऱ्याच्या गोदामाला आग

By

Published : May 11, 2019, 2:35 PM IST

औरंगाबाद- शहरातील कचराकोंडीला पंधरा महिने झाल्यानंतरही मनपाकडून शहरात ठीक-ठिकाणी कचरा साठवून ठेवला जात आहे. रमा नगरातील शेडमध्ये अशाच पद्धतीने साठविलेल्या सुक्या कचऱ्याला गुरुवारी भीषण आग लागली. यात शेड्ससह कचरा जळून खाक झाला आहे. या आगीत शेजारील दोन मोठी झाडेही भस्मसात झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट उठले होते.

कचऱ्याच्या गोदामाला आग


रमानगर येथील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबाच्या मदतीने जवानांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आग इतकी भीषण होती, की पाणी मारून ही आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने कचरा उखडून फेकण्यात आला. त्यानंतर आतील कचऱ्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. तरीही संपूर्ण जागेवर कचरा जळून खाक झाला. सोबतच बाजूला असलेले दोन मोठे वृक्षही आगीत भस्मसात झाले.


या आगीची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु घनकचरा विभागाचे प्रमुख मात्र इकडे फिरकले नाहीत. काही जणांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोन घेतले नाही. गतवर्षी शहरात कचरा कोंडी निर्माण झाली, त्यावेळी मनपाला मदत म्हणून नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठविण्यासाठी रमा नगरातील मोकळी जागा उपलब्ध करून दिली होती. पालिकेने या ठिकाणी मोठे शेड उभारले. कचरा केंद्राच्या जागा निश्चित झाल्यानंतरही मनपाने रमा नगरातील हे तात्पुरते केंद्र बंद केले नाही. पालिकेच्या वतीने सध्या तिथे कचरा साठविण्यात येत आहे. त्याला स्थानिक नागरिक आणि नगरसेविकांनी वारंवार आक्षेप घेतला, तरी मनपाकडून दाद मिळालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details