महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Live Update : हिंदू बांधवांनो, जिथे जिथे भोंगे अजान, बांग देतील तिथे हनुमान चालीसा वाजवा : राज ठाकरे - City Chowk Police Station 3Aurangabad

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : May 3, 2022, 2:57 PM IST

Updated : May 3, 2022, 8:18 PM IST

20:17 May 03

राज ठाकरे यांचं पत्र

20:16 May 03

राज ठाकरे यांचं पत्र

20:16 May 03

राज ठाकरे यांचं पत्र

19:33 May 03

हिंदू बांधवांनो, जिथे जिथे भोंगे अजान, बांग देतील तिथे हनुमान चालीसा वाजवा : राज ठाकरे

हिंदू बांधवांनो, जिथे जिथे भोंगे अजान, बांग देतील तिथे हनुमान चालीसा वाजवा : राज ठाकरे

18:51 May 03

शर्मिला ठाकरे शिवतीर्थावरून बाहेर, राज ठाकरेंच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली

भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर निघून गेल्या आहेत. त्या नेमक्या कुठे गेल्या याबद्दल नक्की माहिती मिळालेली नाही. राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थाच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.

16:43 May 03

राज ठाकरेंच्या घराखाली मनसे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात

पोलिसांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत असल्याने मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जमण्यास सुरुवात झाली आहे.

16:36 May 03

पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरु

पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरु

उद्यापासून होत असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मनसे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. भानुशाली यांच्या कार्यालयात जाऊन भोंगाही जप्त करण्यात आला. भानुशाली यांनी सर्वप्रथम भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवली होती. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाईला सुरुवात झाली आहे.

16:36 May 03

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरु, मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत मुंबई पोलीस मुख्यालयात बैठक सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगा वरून दिलेल्या इशाऱ्यावर ही बैठक होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कायदा व सुव्यवस्था जॉईंट सीपी विश्वास नागरे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे.

15:55 May 03

भडकावणारे भाषण केले तर गुन्हे दाखल होणारच, त्यात काय एव्हडं : संजय राऊत

राज्याच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. मला माहिती मिळाली आहे की, बाहेरच्या राज्यातून लोक आणले जात आहेत आणि दंगलीचे षडयंत्र रचले जात आहे. राज्य सरकार आणि पोलिस ते हाताळण्यास सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. देशभरात असे गुन्हे दाखल आहेत. कुणी भडकवणारे भाषण केले, कुणी असे लिहिले तर त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यात मोठी गोष्ट कोणती? असेही ते म्हणाले.

15:50 May 03

राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार, येथे अल्टिमेटम नाही फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल : संजय राऊत

येथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कसला अल्टिमेटम? ते इथे चालत नाही. महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी देत मनसेला डिवचले आहे.

15:15 May 03

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश, कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका..

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.

15:02 May 03

परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था बिघडवू शकतात, गुप्तचर यंत्रणांचा अहवाल

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तचर यंत्रणांनी धक्कादायक अहवाल दिला आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊ शकतात असा अहवाल गुप्तचरांना मिळाला असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाने दिली आहे.

14:46 May 03

राज ठाकरेंच्या घराखाली मनसे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात

औरंगाबाद / मुंबई :औरंगाबाद येथील जाहीर सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 मे रोजी औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत नियम मोडल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117, 135 आणि 153 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा होत असताना पोलिसांनी 16 नियम दिले होते. त्यात भडकाऊ भाषण करू नये अस सुचित करण्यात आलं होत. मात्र राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केले. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा निष्कर्ष लावण्यात आला. त्यानुसार कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 16 पैकी 12 नियम मोडले असल्याचं पोलिसांनी म्हणलं आहे. त्यात भडकाऊ भाषण करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, आवाजाची मर्यादा ओलांडणे, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणे हे आणि असे नियम तोडल्याच यात म्हणण्यात आल आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.

कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश - दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.

Last Updated : May 3, 2022, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details