औरंगाबाद- भारताचा माजी क्रिकेटर अझहरुद्दीन आणि त्याचा स्वीय सहायक मुजीब खान व सुदेश यांच्याविरोधात बुधवारी सिटी चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सीकडून लाखो रुपयांची परदेशात जाण्याची तिकीटे काढून त्या एजन्सी चालकाची फसवणूक केली.
माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल हेही वाचा -'आकाशने परश्यासारखी उडी मारली, तो माझ्यासाठी देवदूत'
लेबर कॉलनीत राहणारे मोहम्मद शहाब मोहम्मद याकूब हे दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी चालवतात. अझरुद्दीन यांच्या स्वीय सहायक यांच्यासोबत त्यांची ओळख होती. तो नेहमीच परदेशात जाण्याचे तिकीट शहाब यांच्याकडे बूक करत असे. 8 नोव्हेंबर 2019 चे मोहम्मद अझहरुद्दीन यांचे एमिरेट्समध्ये मुंबई- दुबई प्रवासासाठी विमानाचे तिकीट बूक केले होते. तसेच पॅरिस, मुंबई, दिल्ली अशा परतीच्या प्रवासाची तिकीट बुकिंग करण्यास सांगून ऑनलाईन पैसे देण्याचे ठरले. यावेळी पहिल्यांदा शहाब यांचे सुदेशसोबत कॉलवर बोलणे करून देत ओळख करून दिली होती. सुदेशने कॉलवर त्यांना या प्रवासाविषयी सांगितले. त्यामुळे शहाब यांनी सुरुवातीला एकूण सात लाख 23 हजार 990 रुपयांचे तिकीट बूक केले. त्यानंतर दोन तिकिटांसह अझहरुद्दीन व सुदेश यांच्या नावाने दिल्ली, दुबई, पॅरिस प्रवासाचे व परतीचे असे एकूण एक लाख 70 हजार 900 रुपयांचे तिकीट बूक केले. त्यानंतर भारतात परत येईपर्यंत सुदेशने शहाब यांच्याशी संपर्क साधत आणखी पाच जणांचे तिकिटे बूक केली. तर मॅंचेस्टरसह इतर शहराची लाखो रुपयांची तिकिटे बूक केली. या संपूर्ण विदेशवारी दरम्यान सुदेश हाच शहाब यांच्यासोबत संपर्क करत होता. यादरम्यान त्याने प्रवासात अचानक बदल करत काही तिकिटे रद्द केली व नव्या शहराची तिकीट काढायला लावली. यात नऊ ते 12 नोव्हेंबर दरम्यान एकूण 20 लाख 96 हजार 311 रुपयांची रक्कम झाली.
हेही वाचा -'...तर त्यावेळी काँग्रेसने मोठी संधी गमावली असेच म्हणावे लागेल'
दरम्यान, वारंवार त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शहाब यांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर अझरुद्दीन मुजीब खान आणि सुदेश कल यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे