औरंगाबाद -जज साहेब ! रात्री भटके श्वान झोपू देत नाही, महानगर पालिका काही करत नाही, असे म्हणत नगर जिल्ह्यातील नागरिकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. याबाबत लवकरच सुनावणी सुरू होईल, अशी माहिती अॅड. सत्यजित कराळे पाटील यांनी दिली आहे.
- 'ही' आहे तक्रार
नगर शहरातील स्टेशनवरील हेरिटेज कॉलनीतील नागरिक सध्या मोकाट श्वानांमुळे त्रस्त झाले आहेत. भटकी श्वान रात्रीच्या वेळी कॉलनीत येऊन नासधूस करतात. दुचाकी गाड्यांचे सीट फाडतात. चारचाकी गाडीवर चढून नखांमुळे गाडीवर स्क्रॅच वाढतात, उंदीर किंवा घुस तोंडातून पकडून परिसरात टाकतात, सर्वत्र घाण करतात, रात्री भांडल्याने खूप आवाज होतो. त्यामुळे रात्राची झोप खराब होत आहे. रात्रीची झोप हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळत नाही, अस तक्रारीत म्हटले आहे.
- ...म्हणून न्यायालयात घेतली धाव