औरंगाबाद - ऐन पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांना आपल्या लाडक्या बैलाला अंघोळ घालण्यासाठी पाणी नसल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले, पोळ्याच्या दिवशी आपल्या घरातील सदस्य असलेल्या बैलाला चक्क वाशिंग सेंटरवर जाऊन आंघोळ घातल्याचे औरंगाबादच्या वैजापूर येथे दिसून आले.
मराठवाड्यात पाणी टंचाई, बैलांच्या अंघोळीसाठी शेतकऱ्याने गाठले वाशिंग सेंटर - बैल पोळा
दुष्काळाचा बौलांना ही बसला आहे. औरंगाबादच्या वैजापूरमधील एका शेतकऱ्याने आपल्या बैलाना अंघोळ घालन्यासाठी बाशिंग सेंटर गाठले.
मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता यंदा इतकी आहे, की पोळ्याच्या सणासाठी बैलांना आंघोळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना बैल घेऊन अक्षरश: गाडय़ांच्या वॉशिंग सेंटरवर आणावे लागले. राज्यभरात इतरत्र जोरदार पाऊस पडला असताना संपूर्ण मराठवाड्यातील पाणीप्रश्न शिगेला पोहोचला आहे. मराठवाडय़ातील ११ प्रमुख धरणांपैकी जायकवाडी वगळता १० धरणांमध्ये शून्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. डबक्यात जेवढे पाणी साठते तशी एकूण स्थिती आहे. परिणामी बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळाच्या तीव्र वेदना सहन करत आहेत.
गावाच्या जवळपास कोठेच पाणी शिल्लक नसल्याने औरंगाबादजवळील आडगावचे शेतकरी अशोक लोखंडे यांनी त्यांच्या बैलांना चक्क नजीकच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन आंघोळ घातली, तर गावातील काहींनी खास बैलांसाठी टँकर मागवले. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे हे विदारक चित्र. पाच महिन्यांपासून अनेक शेतकरी छावणीमध्ये मुक्कामी आहेत. पोळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या खरेदीवर देखील परिणाम झाला आहे. पोळ्याला बैलांना सजवण्यासाठी लागणारे झूल, घुंगरांच्या माळा, मुंगूस, शिंगांची रंगरंगोटी, इतर रंगीबेरंगी माळा, आदी साहित्याच्या बाजारपेठेतही दुष्काळाचे सावट जाणवत आहे. तीन दिवसांपासून हे साहित्य विक्रीसाठी अनेक दुकानदारांनी साहित्य दुकानाबाहेर सजवून ठेवले आहे. मात्र, दुष्काळामुळे शेतकरी गुरुवारीही बाजारपेठेकडे फिरकला नाही. सलग दुसऱ्या वर्षी पोळ्याच्या बाजारपेठेत ग्राहक नाहीत, असे दुःख व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.