महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2021, 7:58 PM IST

ETV Bharat / city

बनावट मतदान कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुंडलिक नगर पोलिसांची कारवाई

बनावट मतदान कार्ड तयार करून देणाऱ्या टोळीचा पुंडलिक नगर पोलिसांनी पर्दाफाश गुरुवारी सकाळी केला. त्यांच्याकडून ३९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

pundalik nagar police
बनावट मतदान कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबाद - बनावट मतदान कार्ड तयार करून देणाऱ्या टोळीचा पुंडलिक नगर पोलिसांनी पर्दाफाश गुरुवारी सकाळी केला. त्यांच्याकडून ३९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनशाम सोनवणे - पोलीस निरीक्षक, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन

माहिती मिळताच सापळा रचून केली करवाई -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसिल कार्यालयात काही बनावट मतदान कार्ड आल्याचे आढळले. याप्रकरणी तहसीलदार लाड यांनी बनावट मतदान कार्ड तयार करण्यात येत असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांना दिली. दरम्यान, स्वामी समर्थ मंदीरासमोरील गजानन कॉलनी येथे याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी माहिती घेऊन सापळा रचला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार मातोश्री डिजीटल या दुकानावर छापा मारुन हरिष धुराजी वाघमारे (वय 22 वर्षे रा. गजानन कॉलनी गारखेडा) तर हनुमाण चौकात नवनाथ भक्तदास शिंदे (वय 26) या दोघांना अटक करण्यात आली.

असे बनवत होते बनावट ओळखपत्र

दरम्यान, आरोपींची चौकशी केली असता printscard.online या वेबसाईटवर मूळ निवडणूक ओळखपत्राचा डाटा घेऊन.त्यानंतर www.nvsp.in या निवडणूक आयोगाच्या वेबसाईडवरुन कॉपी केला जात होता. त्यानंतर printscard.online या वेबसाईटवर अपलोड करून निवडणूक आयोगाचे वेबसाईट ओपन केली असता साईटवर फक्त बनावट ग्राहकांचा डाटा आला. मात्र, त्यावर फोटो आला नसल्याने ग्राहकांकडून नवीन पासपोर्ट साईज फोटो घेवून अपलोड करून मतदान कार्ड तयार केले.

३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कॉम्पयुटर, प्रिंटर असा एकूण 39 हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी नायब तहसिलदार रेवणनाथ सिताराम ताठे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर क्राईम करणार सखोल तपास

निवडणूक आयोगाच्या नियम व अटीचे उल्लघन करुन printscard.online या वेबसाईटच्या आधारे नवीन फोटो अपलोड करुन स्मार्ट कार्ड बनवून शासनाची फसवणूक केली. बनावट ओळखपत्राची कुठे गैवापर करण्यात आला आहे का याबाबत सायबर क्राईमच्या मदतीने सखोल व बारकाईने तपास होणार असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details