महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पैशासाठी वाट्टेल ते... कोविड रुग्णांच्या जागी दाखल झाले खोटे रुग्ण, सहा जणांवर गुन्हा दाखल - Aurangabad covid center

सोमवारी दोन रुग्णांनी कोविड सेंटरमधून सोडण्यासाठी तगादा लावला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही रुग्णांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे सांगितले.

कोविड केअर सेंटर
कोविड केअर सेंटर

By

Published : Nov 16, 2021, 6:46 PM IST

Updated : Nov 16, 2021, 7:02 PM IST

औरंगाबाद - कोविड सेंटरमध्ये असणारे रुग्ण हे कोरोना बाधित नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब हे रुग्ण दुसऱ्याच्याच नावाने उपचार घेण्यासाठी आले असल्याचा प्रकार मेलट्रॉन कोविड (Covid Centre) सेंटरमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.


सिद्धार्थ उद्यानात (Aurangabad Siddharth Garden) शुक्रवारी दोन तरुणांची कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने महानगरपालिकेच्या मेलट्रोल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यांना कुठलेही लक्षण आढळून आली नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र, त्यांनी औषध घेतली नाहीत. दोन दिवसांनी पॉझिटीव्ह असलेले रुग्ण वेगळे असल्याचे लक्षात आले.

सहा जणांविरोधात पोलिसात तक्रार

हेही वाचा-Rakhi Sawant Vedio : 'देश की गद्दार है दीदी'; राखी सावंतचे कंगनावर टिकास्त्र

दहा हजार रुपये मिळतील म्हणून रुग्णालयात दाखल-
शुक्रवारी दोन रुग्ण दाखल झाल्यावर त्यांनी रविवारी मेलट्रॉन कोविड रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर (Dr Vaishali Mudgalkar) यांना लवकर सोडण्याची विनंती केली. मात्र, सोमवारी बघू असे म्हणून त्यांनी सोडण्यास नकार दिला. सोमवारी या दोन रुग्णांनी पुन्हा कोविड सेंटरमधून सोडण्यासाठी तगादा लावला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. या दोन्ही रुग्णांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे सांगितले. हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. दहा हजार रुपये देतो म्हणून आमिष दिल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा - चंद्रकांत पाटील

मनपाने दिली पोलिसात तक्रार...
हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मेलट्रॉन रुग्णालयाच्यावतीने एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) तक्रार देण्यात आली आहे. कोविड पॉझिटीव्ह असलेले दोघे, त्यांच्या नावाने दाखल झालेले दोघे आणि त्यांना मदत करणारे दोघे अशा सहा जणांविरोधात पोलिसात तक्रार केल्याची माहिती मेलट्रोल कोविड सेंटरच्या डॉ. वैशाली मुदगलकर यांनी दिली.

हेही वाचा-Purvanchal expressway inauguration पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन

Last Updated : Nov 16, 2021, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details