औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासन आणि राज्य अग्निशमन कार्यालयाच्या नावे बनावट नियुक्ती पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या मोबाईलवर आलेल्या एका नियुक्ती पत्राद्वारे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 12 जणांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या लेटर हेडवर तयार झाले नियुक्तीपत्र
बनावट नियुक्ती पत्र सादर केल्याप्रकरणी अग्निशमन विभागाचे प्रमुख आर के सुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महापालिकेच्या लेटर हेडवर बारा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यात आले. त्यावर प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांची बनावट स्वाक्षरीही करण्यात आली आहे. इतकंच नाही तर लेटर हेडवर असलेला आवक-जावक क्रमांकही खोटा असून, या पत्राची माहिती आयुक्तांना व्हाट्सऍपवर मिळाली होती. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. नियुक्ती पत्र दिलेल्या बारा जणांचा शपथविधी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होईल. त्यास राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहतील असे या पत्रात म्हटले होते.
नोकरीसाठी महापालिकेचे बनावट नियुक्ती पत्र, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार - astik kumar pandey
बनावट नियुक्ती पत्र सादर केल्याप्रकरणी अग्निशमन विभागाचे प्रमुख आर के सुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महापालिकेच्या लेटर हेडवर बारा जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यात आले. त्यावर प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांची बनावट स्वाक्षरीही करण्यात आली आहे.
नोकरीसाठी महापालिकेचे बनावट नियुक्ती पत्र, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार
Last Updated : Mar 5, 2021, 2:13 PM IST