औरंगाबाद रक्षाबंधन ( Rakshabandhan festival 2022) म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस आपण सर्वजण साजरा करतो. बहिणीकडून राखी बांधून घेत भाऊ तिला आयुष्यभर सोबत राहण्याचे आश्वासन देतो. मात्र आज आधुनिक काळात राखीचे स्वरूप बदलले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राखी मधून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या सणा सोबत पर्यावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी आनंदी फाउंडेशन ( Anandi Foundation Aurangabad ) गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक राखी ( Eco Friendly Rakhi ) तयार कारण्याचे काम करत आहे. त्यातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.
पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती -रक्षाबंधन ( Rakshabandhan festival 2022) म्हणलं की बहिण आपल्या भावासाठी सुंदर राखी घेतोच. सर्वात चांगली आणि आकर्षक राखी आपल्याच भावाच्या हातात असावी अस प्रत्येक बहिणीला वाटत. त्यातच बाजारात आकर्षक राख्या विक्रीसाठी येतात. त्यात बहुतांश राख्या पर्यावरणाला हानीकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच भाजप नेत्या विजया रहाटकर यांच्या सोबत आनंदी फाउंडेशन दर वर्षी पर्यावरण पूरक राखी तयार करण्याचे काम करत आहे. यावर्षी देखील असाच उपक्रम राबवत सुती आणि लोकरच्या माध्यमातून राखी तयार करण्यात आल्या आहेत. सुत, लोकर पासून फुल, पान, दोरा तयार करून राखी तयार करण्यात आली आहे. ज्याने पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही. तर काही भाग क्ले पासून तयार करण्यात आला आहे जेणे करून राखी आकर्षक देखील वाटेल आणि पर्यावरणाला हानी देखील होणार नाही अशी माहिती विजया रहाटकर ( Vijaya Rahatkar Aurangabad ) आणि संस्थेच्या विभावरी भालेराव यांनी दिली.
महिलांना मिळतो रोजगार -आजच्या आधुनिक जगात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. राखी देखील यंत्रावर तयार केली जात आहे. मात्र आनंदी फाउंडेशन महिलांच्या माध्यमातून हाताने तयार केलेल्या राख्या तयार करते. या माध्यमातून यावर्षी पाच ते सहा हजार राख्या तयार करण्यात आल्या. त्यामधून चाळीस गरजू महिलांना रोजगार देण्याचे काम करण्यात आले. बाजार पेठेत राखी विक्रीसाठी देताना, लागलेला खर्च फक्त व्यावसायिकांकडून घेण्यात आला. ना नफा ना तोटा तत्वावर दर वर्षी काम केले जाते. उद्देश फक्त एकच पर्यावरण रक्षण आणि म्हणूनच छोटा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आनंदी फाउंडेशनच्या वतीने भाजप नेत्या विजया रहाटकर आणि संस्थेच्या विभावरी भालेराव यांनी दिली.