वैजापूर तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीच्या गाळ्यांसमोर काही व्यवसायकांनी विना परवाना गाळे अतिक्रमण ( Encroachment Removed ) करून बांधण्यात आले होते. गाळे हटविण्याबाबत व्यावसायिकांनी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मनाई हुकूम मागितला होता. यापूर्वीही यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. ( Virgaon Gram Panchayat )तेच आदेश येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कायम ठेवले होते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या विरोधात दाखल करण्यात आलेले अपिलही न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबाबतचा मार्ग आता मोकळा झाला होता आणि अखेर सोमवारी हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.
अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी गाळे बांधले याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीने गाळे बांधून व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिलेले होते. याच गाळ्यांसमोरील जागेवर काही व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी गाळे बांधले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना नोटीस बजावली होती. दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नोटीस देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे.