औरंगाबाद -गोलटगाव परिसरातील आठ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (८ नोव्हेंबर) दुपारी पाच वाजता उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनीच मुलीचा खून केल्याचा आरोप आईकडील नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -नवाब मलिक यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचा आरोप
सारिका उर्फ भक्ती दगडू पाचे (वय ८ रा. गोलटगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. सारिकाची आई काही दिवसांपूर्वी भाऊबिज निमित्त माहेरी सोनक पिंपळगाव येथे गेली होती. यामुळे सारिका वडील, मोठी बहीण आजीसह राहत होती. सारिका ही दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. सोमवार आजी व मोठी बहीण कापूस वेचण्यासाठी शेतात गेले तर वडील घरी असताना तीन वाजेच्य सुमारास सरिकाने गळफास घेतला. दरम्यान गावातील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सारिकाला घाटी रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. बनसोड करीत आहे.