महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अनिल देशमुखांवर सात वेळा झालेली ईडीची कारवाई हास्यास्पद - सुप्रिया सुळे - अनिल देशमुख कारवाई प्रकरण

ईडी आणि सीबीआयचा प्रचंड गैरवापर वाढला आहे. आपण प्रचंड असंवेदनशील झाले आहोत, असे मला वाटते, असे सांगत अनिल देशमुखांवर एक वेळ रेड झाली समजू शकते, पण 7 वेळा, हे हास्यास्पद आहे. सरकारी संस्थांचा किती गैरवापर करणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या औरंगाबादमध्ये बोलत होत्या.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे

By

Published : Sep 20, 2021, 7:52 PM IST

Updated : Sep 20, 2021, 8:14 PM IST

औरंगाबाद - अनिल देशमुख यांच्या घरी ईडीची रेड झाली मान्य आहे. मात्र सात वेळा रेड हे हास्यास्पद आहे. एजन्सीचे गैरवापर सुरू आहे. असे माझे मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

'ईडीचा गैरवापर होत आहे'

तुम्ही कुठल्या आधाराने असे वैयक्तिक प्रश्न विचारतात, तुम्ही कुठल्या एजन्सीचे प्रमुख आहेत का? चौकशी करा, आरोप करा, पण ते सत्य आहेत का? खरे आहे का? याचीही चाचपणी करणे गरजेचे आहे, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी सोमैया प्रकरणावर दिले आहे. इतका सरकारी एजन्सीचा गैरवापर नको. ईडी आणि सीबीआयचा प्रचंड गैरवापर वाढला आहे. आपण प्रचंड असंवेदनशील झाले आहोत, असे मला वाटते, असे सांगत अनिल देशमुखांवर एक वेळ रेड झाली समजू शकते, पण 7 वेळा, हे हास्यास्पद आहे. सरकारी संस्थांचा किती गैरवापर करणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर संयमी भूमिका

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून काही वक्तव्य करत आहेत. कोणी काय बोलायचे हे सांगू शकत नाही. मात्र त्यावर पण बोलायचे का नाही हे आपण ठरवू शकतो, असे म्हणत अत्यंत शांतपणे उत्तर देत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणे टाळले. तर किरीट सोमैया यांची 6 तास चौकशी विषयावर मला माहिती नाही, मी माहिती घेऊन नक्की बोलेल, असे त्या म्हणाल्या.

'त्यांच्या पक्षात गेलेला प्रत्येक जण पवित्र होतो'

सुप्रिया सुळे यांनी निवडणुकांची एक आठवण सांगत, आमच्या पक्षात असला तर तो देशद्रोही आणि त्यांच्या पक्षात तो गेला की धुवून निघतो, केंद्र सरकार दडपशाहीने वागत आहे. माझ्या वडिलांनाही नोटीस आली आहे. एक नोटीस काढून त्याबाबत होणारी बदनामी त्या कुटुंबियांना भोगावी लागते. त्याची सत्यता पडताळली जात नाही. त्याचा विचार करायला हवा, अस मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -सोमैया प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करा - आशिष शेलार

Last Updated : Sep 20, 2021, 8:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details