महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईडीचा व्हिडिओकॉन कंपनीला दणका; अनेक ठिकाणी टाकले छापे - व्हिडिओकॉन कंपनी न्यूज

औरंगाबाद येथील चितेगावमधील व्हिडिओकॉन कंपनी आणि औरंगाबाद शहरातील धुत यांच्या कार्यालयासह इतर ठिकाणीही ईडीने छापे टाकले आहेत.

Videocon company
व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीचे छापे

By

Published : Jul 16, 2021, 8:43 PM IST

Updated : Jul 16, 2021, 10:36 PM IST

औरंगाबाद -व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीने छापे टाकले आहेत. औरंगाबाद येथील चितेगावमधील व्हिडिओकॉन कंपनी आणि औरंगाबाद शहरातील धुत यांच्या कार्यालयासह इतर ठिकाणीही ईडीने छापे टाकले आहेत. गुरूवारपासून झाडाझडती सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

व्हिडिओकॉन कंपनीवर ईडीने छापे टाकले

हेही वाचा -नाना पटोले यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे -दिलीप वळसे पाटील

  • काय आहे प्रकरण?

2009 ते 2011 या दरम्यान व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत व चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना नियम धाब्यावर बसून तब्बल 1 हजार 875 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर करण्यात आलेला आहे. या संदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला असून ईडीकडूनही तपास केला जात आहे. चंदा कोचर यांच्या विरोधात आयसीआयसीआय बँकेकडून निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्णा समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर चंदा कोचर यांच्यावर फेब्रुवारी 2019मध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले, असा आरोप करण्यात आला होता. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धुत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.

हेही वाचा -भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी

Last Updated : Jul 16, 2021, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details