महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉ. भागवत कराड यांना केंद्रात संधी? चर्चेला आले उधाण, डॉ. कराड दिल्लीला रवाना - भागवत कराड यांना केंद्रात संधी?

केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याच बोललं जातं आहे, यात भाजपचे राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली. त्यामुळे खासदार डॉ कराड दिल्लीला रवाना झाले आहेत.

Dr. Bhagwat Karad likely to get a chance at the center
भागवत कराड

By

Published : Jul 7, 2021, 1:58 PM IST

औरंगाबाद - केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याच बोललं जातं आहे, यात भाजपचे राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली. त्यामुळे खासदार डॉ कराड दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

डॉ भागवत कराड मुंबईला रवाना...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे. नारायण राणे, हिना गावित यांच्या नावांची चर्चा असताना औरंगाबाद येथील भाजप खासदार डॉ भागवत कराड यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी जाण्यासाठी फोन आला तर जाने सोयीचे व्हावे याकरिता डॉ कराड मंगळवारी औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झाले.

शिवसेनेला शह देण्यासाठी होऊ शकते निवड...
औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेची ताकद भाजप पेक्षा अधिक आहे, अस बोललं जातं. औरंगाबादेत गेल्या वीस वर्षांपासून लोकसभेची जागा शिवसेनाच्या ताब्यात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने औरंगाबादसाठी एक मंत्रिपद देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे खासदार डॉ भागवत कराड यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता असल्याच बोललं जातं आहे.

ओबीसी चेहरा असल्याने मिळू शकते संधी....
मराठवाड्यातील ओबीसी चेहरा म्हणून डॉ. कराड यांना खासदारकी देण्यात आली होती. राज्यात ओबीसी अरक्षणावरून राजकारण तापत चाललं आहे. त्यामुळे ओबीसी खासदाराला संधी देऊन ओबीसी समाजाला संधी दिल्याचा संदेश भाजप देऊ शकते. अशी शक्यता असल्याने डॉ भागवत कराड यांना मंत्रीमंडळात संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. आता मंत्रिमंडळात नेमकी संधी कोणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details