औरंगाबाद - गरखेडा भागातील सलून सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिथे येणारे ग्राहक येत असताना रस्त्यात कोणी उभे राहत नाही सगळे बाजूला सरकतात. आता प्रश्न पडेल सलूनमध्ये येणाऱ्याला कोण घाबरले. तर त्याच उत्तर म्हणजे हे ग्राहक माणूस नसून पाळीव श्वान ( Pet dogs) आहेत. इथे श्वानासाठी,अंघोळ ( dog bath ) , कटिंगची ( cutting facilities ) विशेष ( Special facilities for caring dogs salon) व्यवस्था केलेली आहे. वाढलेले केस काढणे अशा सुविधा या सलूनमध्ये ( Special facilities for salon) ) दिल्या जात आहेत.
अत्याधुनिक सलून -गारखेडा भागात असलेले सलून चर्चेत आहे. रोज या सलूनमध्ये कधी चांगल्या कारमधून तर कधी दुचाकीवर, तर कधी पायी श्वानप्रेमी आपले श्वान घेऊन येत असतात. या सलूनमध्ये श्वानांची काळजी ( Special facilities for caring dogs ) घेण्यासाठी विशेष सोय केली गेली आहे. श्वानांची काळजी घेताना त्याची स्वच्छता महत्वाची असते. मात्र, अनेकांना ते शक्य होत नाही. अशा श्वान प्रेमींसाठी तशी व्यवस्था करण्यात आली आहे. इथे मोठा टब ठेवण्यात आला आहे. त्यात पाण्याची व्यवस्था, विशेष शॅम्पू श्वानासाठी ठेवण्यात आले आहे. इथे श्वानांना प्रेमाने काळजी अंघोळ घातली जाते. नंतर ड्रायरने केस सुखावले जातात. त्याचे वाढलेले केस काढले जातात. त्यांची वाढलेली नख देखील काढली जातात. केस काढल्यावर विशेष पावडर लावून त्यांना होणारा त्रास दूर केला जातो. त्यासाठी काही साहित्य तयार करून तर, काही साहित्य बाहेरून मागावल्याची माहिती सलून चालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.