महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Ghati Hospital : बेड न दिल्याने डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मारामारी

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेड न दिल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. यानंतर नातेवाईक यांनी डॉक्टरांना मारहाण (Patient Relatives beaten Doctor) केली असून, डॉक्टरांनीही रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण (Doctor beaten Patient Relatives) केली. हा प्रकार औरंगाबादमधील घाटी (Ghati Hospital Aurangabad) रुग्णालयात घडला आहे.

Aurangabad Ghati Hospital
डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मारामारी

By

Published : Dec 1, 2021, 3:19 PM IST

Updated : Dec 1, 2021, 5:48 PM IST

औरंगाबाद - रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी (Hospital Employees) बेड (Bed) न दिल्याने नातेवाईकांनी टेबल आडवा लावत रुग्णासाठी व्यवस्था केली. मात्र, तुम्ही टेबल असा का लावला याचा जाब विचारल्याने रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण (Patient Relatives beaten Doctor) केली, तर डॉक्टरांनी देखील रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण (Doctor beaten Patient Relatives) केली.

डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मारामारी

अधिष्ठाता, पोलीस निरीक्षक घटनास्थळी -

घाटी रुग्णालयातील (Ghati Hospital Aurangabad) अपघात विभागाच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला फोल्ड होणारा बेड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी न दिल्याने नातेवाईकांनी टेबल आडवा लावत रुग्णासाठी व्यवस्था केली. मात्र, तुम्ही टेबल असा का लावला याचा जाब विचारल्याने रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली, तर डॉक्टरांनी देखील रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता अपघात विभागासमोर दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्यावर कारवाई करून डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, घटनास्थळी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार देखील आले होते. त्यांनी घटनेची माहिती घेऊन तक्रार असल्यास तत्काळ दाखल करून घेऊ व आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल, असे डॉक्टरांना सांगितले.

Last Updated : Dec 1, 2021, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details