औरंगाबाद- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत अनेक नियम घालून दिले आहेत. परंतू जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी 26 अस्थापनांवर कारवाई केली आहे.
शहरातील २६ आस्थापणांवर कारवाई स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
सकाळी 9.00 वाजता कामगार उपायुक्त, महानगरपालिका व महसुल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत विशेष भरारी पथके तयार करुन दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून) चालू राहणार नाही, याची खबरदारी घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठीच्या सुचना दिल्या. या बैठकीनंतर स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड अशा अनेक ठिकाणी पाहणी केली आहे. तसेच नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर कारवाई केली आहे. विशेष भरारी पथकात कामगार उपआयुक्त, औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी, महसुल विभागातील अधिकारी, महानगर पालिकेतील कर्मचारी व पोलीस खात्यातील त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.
26 अस्थापनांवर कारवाई
सदर पथकाने सकाळी 9.30 ते 1.00 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालुन पुढील 26 आस्थापना बंद केल्या.
1. राज क्लॉथ् स्टोअर्स, जालना रोड, औरंगाबाद
2. गजानन गिफ्ट ॲन्ड टॉईज, जालना रोड
3. शिवानी ज्वेलर्स, जालना रोड
4. हार्डवेअर कलेक्शन, जालना रोड
5. हिल्स लाईट ॲन्ड इलेक्ट्रीकल्स, सेव्हन हिल, जालना रोड
6. जीवन तायडे फोटो लॅब, निराला बाजार
7. सुनील पांडे फोटो लॅब, निराला बाजार
8. सुभाष जैन फोटो लॅब
9. प्रॉमीस स्टेशनरी, निराला बाजार
10. कसबेकर झेरॉक्स ॲन्ड स्टेशनरी नागेश्वरवाडी
11. गणेश दुध डेअरी, नागेश्वरवाडी, औरंगाबाद
12. रत्नागिरी मँगो हाऊस नागेश्वरवाडी, औरंगाबाद
13. कृष्णाई केक ॲन्ड डेली निडस, नागेश्वरवाडी
14. अशोका इंटरप्रायजेस मल्टी सर्व्हिसेस, मुकुंदवाडी रोड
15. बालाजी इलेक्ट्रीकल्स, मुकुंदवाडी रोड
16. सार्थक भुजंगराव वाघ शेगाव कचोरी सेंटर, टी.व्ही सेंटर
17. प्रमोद कांतीलाल जैन महाविर मोर्टस, टी.व्ही सेंटर
18. संतोष नामदेव म्हस्के सहारा मल्टी सर्वीसेस, जैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर
19. नृसिंह युनिफॉर्म शुटींग शर्टींग सेंटर, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर
20. ओम कलेक्शन, मोहटा देवी चौक, बजाजनगर
21. तिरुमला साडी सेंटर, मोहटा देवी चौक, बजाजनगर
22. महावीर ज्वेलर्स, मोहटा देवी चौक, बजाजनगर
23. आनंद इलेक्ट्रीकल्स धमन कॉम्प्लेक्स, महावीर चौक, वाळूज
24. चिंतामणी ॲल्युमिनीअम ॲन्ड ग्लास वाळूज
25. जुवेरिया क्रॉकरी कलेक्शन, किराडपुरा
26. रमजान भाई प्लॉटींग ऑफीस, किराडपुरा
अन्न व औषधी प्रशासनाने संस्कृती फास्ट फुड सेंटर, कॅनॉट प्लेस, सिडको आणि एमजीएम गेट समोरील हर्ष मेडिकल या आस्थापनेस कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपेपर्यंत अन्न पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध घातला आहे. राज्य शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी 16 आस्थापना मालकाकडुन रु. 1,25,000 रु. इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे.
हेही वाचा -कोकण दौरा म्हणजे चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका