'धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अन्यथा, मंत्रालयासह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू' - aurangabad dhangar community news
धनगर आरक्षणाच्या मगणीसाठी आज पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली. प्रत्येक वेळी आश्वासन देण्यात येतात. मात्र, समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक होईल, असा ईशारा औरंगाबादेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अन्यथा, मंत्रालयासह मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडू
औरंगाबाद - मराठा आरक्षणासोबत आता धनगर समाजाने आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी नाही लागला तर मंत्रालय आणि मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा धनगर समाजाच्या मराठवाडा कोअर कमिटीचे भरत सोन्नर यांनी दिला.