औरंगाबाद- बीडच्या तांड्यावरील त्या तरुणीच्या प्रकारणाची सखोल चौकशी झाल्यावर वक्तव्य करणे योग्य राहील. तिची हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मात्र तुम्हालापण माहीत आहे, ही आत्महत्या आहे असे वक्तव्य राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे शहरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बीडच्या तांड्यावरील तरुणीच्या मृत्यूबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. ज्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्या परिस्थितीबाबत पोलीस तपास पूर्ण होऊ द्या. नंतर कोणाचे नाव येईल ते बघू, असे विधान मुंडे यांची पत्रकारांच्या प्रश्नावर केले आहे.
'त्या' तरुणीची हत्या नाही, तर आत्महत्याच हेही वाचा-सरकारी आणि इतर क्रिप्टोचलन एकाचवेळी स्वतंत्रपणे चालू शकतात-आयएएमएआय
शिवजयंती चांगली साजरी व्हावी-
आगामी शिव जयंती चांगली साजरी व्हावी, अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, प्रचलित नियम पाळावे लागतील. पहिला जीआर निघाला त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटून जीआर बदलला पाहिजे, अशी भूमिका मांडली. निर्बंध घालण्यापेक्षा मोकळेपणाने जयंती साजरी केली पाहिजे. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने हे नियम घालून दिले आहेत. त्यांचे पालन झाले पाहिजे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-ऐतिहासिक! शेअर बाजाराने दिवसाखेर ओलांडला ५२ हजारांचा टप्पा
बीडसाठी शंभर कोटींच्या वाढीव निधीची मागणी...
पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही बीड जिल्ह्यासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. मागील वर्षी 242 कोटींचा निधी मिळाला होता. यावेळी 340 कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे वाढीव निधी मिळाला तर रस्त्यांची आणि इतर कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने यापूर्वीच आरोप मागे घेतले आहेत. तर, पुजा चव्हाण या बीडमधील तरुणीचा पुण्यात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील दुसऱ्या मंत्र्यावर कारवाई करावी, अशी भाजपकडून मागणी केली जात आहे.