महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांना अतिवृष्टीची खरी परिस्थिती माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 21, 2020, 6:19 PM IST

Updated : Oct 21, 2020, 6:52 PM IST

18:35 October 21

जीएसटीचे कारण सांगून मदत टाळू नये

जीएसटीचे कारण सांगून शेतकऱयांना देणारी मदत राज्य सरकारने टाळू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे पैसे दिले नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबादमध्ये सांगितले होते.    

18:34 October 21

नाथाभाऊंनी माझ्यावर केलेले आरोप खोटे - फडणवीस

एकनाथ खडसे यांनी राजीनामा देणं हे दुर्देवी आहे. त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. माझ्याबद्दल वाद असेल तर त्याबाबतची तक्रार एकनाथ खडसे यांनी वरिष्ठांकडे करायला पाहिजे होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.      

18:26 October 21

यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राल तोकडी मदत मिळाली

सध्याचे राज्य सरकार हे मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. मात्र, यूपीएच्या काळात केंद्र सरकारने कायमच महाराष्ट्राला तोकडी मदत करत होते. त्यामुळे केंद्राचे कारण सांगून मदत टाळू नये असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

18:04 October 21

संपूर्ण पंचनामे झाले हे खोटे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

औरंगाबाद - सध्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याला धीर देऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्याला मदत कशी मिळेल यासाठी सरकारने लक्ष घालणं गरजेचं असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज औरंगाबाद जिल्हा दौऱयावर आहेत.    

Last Updated : Oct 21, 2020, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details