औरंगाबाद- नाथाभाऊंनी राजीनामा देणे दुर्दैवी आहे. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन करायचे असते, त्यांनी मला व्हिलन केले. त्यांनी मांडलेली बाजू ते अर्धसत्य आहे. आज त्याच्यावर बोलणार नाही. वेळ आलं की बोलेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत दिली.
'खडसेंना पक्ष सोडायचाच होता, जाताना मला व्हिलन केलं' - एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतपणे पक्षाचा राजीनामा दिला. लवकरच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधून त्रास नव्हता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्रास दिल्याचा आरोप खडसे यांनी जळगाव येथे केला होता.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतपणे पक्षाचा राजीनामा दिला. लवकरच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधून त्रास नव्हता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्रास दिल्याचा आरोप खडसे यांनी जळगाव येथे केला. त्यावर फडणवीस यांनी आपल्याबाबत तक्रारी होत्या तर त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या, अशी प्रतिक्रिया दिली.
एखादा नेता पक्ष सोडून गेला तर थोडाफार फरक पडतो, मात्र भाजप एवढा मोठा पक्ष आहे की, कुणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही आणि कोणाच्या येण्याने बदल घडत नाही. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन करायचे असते, त्यांनी मला व्हिलन केले. त्यांनी मांडलेली बाजू ते अर्धसत्य आहे, अशी टीका फडणवीस यांनी खडसेंवर केली. तसेच भाजपचा कोणताही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. अर्जुन खोतकर यांनी कोणाला तरी ऑफर दिल्याच्या चर्चा आहेत. मुळात अर्जुन खोतकरला कोणी किंमत देते का? ते माझे चांगले मित्र आहेत. मात्र, त्यांनाच किंमत नाही ते काय दुसऱ्याला ऑफर देणार, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.