औरंगाबाद -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या आजचा मोर्चा अद्धभूत पूर्व आहे. आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची लढाई असून शिवसेनेचा भष्ट्राचार संपवण्यासाठी आम्ही आलो आहे, असेही ते म्हणाले.
Aurangabad Water Crises : 'ही लढाई सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची; शिवसेनेमुळेच औरंगाबादचा पाणीप्रश्न गंभीर' - Devendra Fadnavis In Aurangabad
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या आजचा मोर्चा अद्धभूत पूर्व असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - आजचा मोर्चा हा भाजपाचा नाही, जनतेचा आहे. आजचा मोर्चा अद्धभूत पूर्व आहे. आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची लढाई असून शिवसेनेचा भष्ट्राचार संपवण्यासाठी आम्ही आलो आहे. औरंगाबदमध्ये पाण्यासाठी वणवण करावे लागते. अशा परिस्थितीत आम्ही शांत बसू शकत नाही. आज आम्ही सरकारला चेतावणी देत आहोत. जोपर्यंत औरंगाबामध्ये पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याचा आधार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही जोरदार प्रहार केला. 'मी म्हणतो संभाजीनगर' मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याचा आधार घेत त्यांनी 'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा' असे आश्वासन मुख्यमंत्री देतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. शिवेसेनेच्या बेईमानीमुळे औंरगाबाद तहानलेलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा -Aarey Forest : आरेतील पक्षांची तहान भागवण्यासाठी धडपडणारा अवलिया !