महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्ण बरा होऊन महिना उलटल्यावर डेल्टा व्हेरियंटचा अहवाल आला पॉझिटिव्ह, रुग्ण मात्र ठणठणीत - डेल्टा व्हेरियंटचा अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबादमधील साठ वर्षीय व्यक्तीला 3 जुलै रोजी कोरोनाबाधित असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 15 जुलै रोजी पुन्हा थंडी ताप, अंगदुखी जाणवू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर चक्क महिना भराने त्यांचा डेल्टा व्हेरियंटचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

Delta variant report came back positive after a month
डेल्टा व्हेरियंटचा अहवाल आला पॉझिटिव्ह

By

Published : Aug 10, 2021, 11:49 AM IST

औरंगाबाद - डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळून येत असल्याचे समोर येत आहे. त्यात मराठवाड्यात या प्रकारचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत. येथील एका साठ वर्षीय व्यक्तीचा कोरोनातून बरे झाल्यावर तब्बल एक महिन्याने अहवाल प्राप्त झाल्याने रुग्णाला अचानक धडकी भरली आहे.

कोरोना रुग्ण बरा होऊन महिना उलटल्यावर डेल्टा व्हेरियंटचा अहवाल आला पॉझिटिव्ह

काय आहे प्रकरण -

औरंगाबादमधील साठ वर्षीय व्यक्तीला 3 जुलै रोजी कोरोनाबाधित असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 15 जुलै रोजी पुन्हा थंडी ताप, अंगदुखी जाणवू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. सात दिवस उपचार दिल्यानंतर 22 जुलै रोजी त्यांना घरी सोडण्यात आले. आता ते ठणठणीत असून त्यांनी आपले दैनंदिन काम पुन्हा सुरू केले. या घटनाक्रमाला एक महिना होत आहे. त्यानंतर अचानक या व्यक्तीचा डेल्टा व्हेरियंट अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोविड तपासणीनंतर एका महिन्याने आला अहवाल -

औरंगाबाद येथील साठ वर्षीय व्यक्तीला पुण्यातून एक फोन आला. त्यामध्ये तुम्ही डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह आहात असे सांगण्यात आले. त्यावेळी या व्यक्तीला अचानक कळेनासे झाले. मी एक महिन्यापूर्वी आजारी होतो. आता मी ठणठणीत आहे. अचानक कसा फोन आला? असा प्रश्न पडला असताना मनपाचे पथक घरावर येऊन धडकले. त्यांनी या रुग्णांची चौकशी केली आणि तुमचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे असे सांगून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

घाबरू नका, काळजी घ्या -

रुग्णाचा डेल्टा व्हेरियंट अहवाल पॉझिटिव्ह आल्याची जिल्ह्यातील पहिली घटना असल्याने सर्वत्र भीती पसरली आहे. आता तिसरी लाट डेल्टा व्हेरियंटची असल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आढळून आलेला रुग्ण एक महिन्या पूर्वीच बरा झाला असून तो आता ठणठणीत आहे. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी केले आहे.

हेही वाचा -चिंताजनक! जळगावात डेल्टा प्लस व्हेरियंटचे पुन्हा 6 नवे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details