औरंगाबाद - एखाद्या कुटुंबियांना प्राण्यांचा लळा लागल्याचं आपण अनेकदा पाहिलं. तसाच काहीसा प्रकार झालटा फाटा येथील जाधव कुटुंबात पाहायला मिळत आहे. या कुटुंबात ते आले. कुटुंबात रमले मात्र चार दिवसात त्याला जावं लागलं. मात्र, काही दिवसांमध्ये त्याने चांगलाच लळा लावला. ते दुसरं तिसरे कोणी नाही तर हरणाचे पिल्लू म्हणजे पाडस होते.
जखमी अवस्थेत सापडले होते हरीण
चार दिवसांपूर्वी झालटा फाटा येथे काही कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लाला (Dogs Attacked on Deer) घेरून हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाल्याची माहिती प्राणीमित्र नितेश जाधव यांना मिळाली. आपल्या सहकाऱ्यांसह ते घटनास्थळी धावले. त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्या पिल्लाची सुटका केली. त्यावेळी त्याच्या शरीरावर चार ते पाच ठिकाणी गंभीर जखमा झाल्याचे दिसून आलं. तातडीने वन विभागाला त्याबाबत माहिती देत त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्याच्यावर चार दिवस उपचार करण्याची गरज असल्याने त्या हरिणाला जाधव यांनी आपल्या घरी आणले. जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्याची घरच्या सदस्यांसारखी काळजी घेतली. आणि तो घरात इतर सदस्यांसारखा वावरू लागला. वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्याला पुन्हा त्याच्या कळपाजवळ सोडत असल्याची माहिती प्राणीमित्र नितेश जाधव यांनी दिली.
कुटुंबीयांनी घेतली काळजी